भोसरी : गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने गुरुवारी (दि.९)कारवाई करत दपोडी परिसरातून दोन सराईतांना पिस्टल सह अटक केली आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
मुनाफ रियाज पठाण (वय २७ रा. नानापेठ पुणे ) व (भोसरी)देविदास उर्फ देवा बाळासाहेब गालफाडे (वय २७ रा. कळसमाळवाडी रामगडवरती विश्रांतवाडी पुणे अशी अटक आरोपींचाी नावे आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक कदम यांना भोसरी बातमीदारा करवी बातमी मिळाली कि, दोन सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार कमरेला पिस्टल लावून दापोडी परिसरात फिरत आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा दोनचे पथक घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.
यावेळी आरोपींचा अंग झडती घेतली असता त्यांच्या कमरेला दोन पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळुन आली.मुनाफ व देविदास उर्फ देवा हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचा पिस्टल जवळ बाळगण्याचा नक्की काय उद्देश होता, पिस्टल हत्यार नक्की कोठून व कोणत्या कारणासाठी आणले, पिस्टल हत्यार कोणाला विक्री करणेसाठी आले होते का याबाबत सखोल तपास सुरु आहे. तुर्तास आरोपी विरोधात गुन्हे शाखेकडून भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५९ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे फिर्याद घेवून भोसरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments