Type Here to Get Search Results !

हडपसर पोलीस काढतायेत झोपा ; कायदा आणि सुव्यवस्था राखणारे गेले गाड झोपेत ; अपघात ग्रस्त नागरिकाचा झाला रक्त बांभाळ ; अधिकाऱ्यांनी फोन न उचलण्याचा घेतलाय बडगा ?

हडपसर पोलीस काढतायेत झोपा ; कायदा आणि सुव्यवस्था राखणारे गेले गाड झोपेत ; अपघात ग्रस्त नागरिकाचा झाला रक्त बांभाळ ; अधिकाऱ्यांनी फोन न उचलण्याचा घेतलाय बडगा ?

पुणे :- शहरात पोलीस योग्य रीतीने काम करत असताना, हडपसर पोलीस ठाण्यातील कर्मचारी झोपा काढत असल्याचे तक्रारदार नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. घडला प्रकार असा की, शुक्रवारी 10 नोव्हेंबरला सकाळी साडे सहा वाजता हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य चौकात मंत्री हाईट समोर एक अपघात घडला होता. अपघात घडल्या बरोबरच अपघात ग्रस्त आणि त्यांच्याबरोबर काही वरिष्ठ व्यक्ती पोलीस ठाण्यात गेले असता, त्याठिकाणी भलताच प्रकार घडला आहे. पोलीस ठाण्यात एकही पोलीस उपस्थित नसल्याने अक्षरशः तक्रार दारांना पोलीस ठाण्यात जाऊन आपातकालीन क्रमांक 100 नंबरला (Control Room) संपर्क साधण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण पोलीस ठाण्यात एकही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित नसल्याचे स्पष्ट निदर्शनास आले आहे. अक्षरशः कंट्रोल रुम 100 वर दोनदा कॉल करून सुद्धा पोलीस ठाण्यातच मदत मिळाली नसल्याचे चित्र दिसून आले आहे. याही पलीकडे ज्यांना मदत हवी होती ते व्यक्ती अक्षरशः रक्त बांभाळ झाले होते. आणि त्यांच्या मदतीसाठी जे व्यक्ती उपस्थित होते ते व्यक्ती कृषी विभागाचे जिल्हा संशोधन प्रतिनिधी DRP कृषी विभाग पुणे, उद्योग व्यवसाय मार्गदर्शक पी टी काळे हे आले होते. यांना हा प्रसंग पाहायला मिळाला आहे. अक्षरशः पोलीस ठाण्यातच मदत मिळवण्यासाठी त्यांचा 1 तास वाया गेला आहे. यावर सध्या प्रश्न असा निर्माण झाला आहे की एखादा मोठा प्रसंग घडला तर हडपसर पोलीस कसे कामकाज करत असतील यावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
याचा व्हिडीओ देखील आमच्या हाथी लागले आहे.

पोलीस अधिकारी फोन न उचलन्याचा घेतला बडगा ?
याबाबत माहिती घेण्याकरिता हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना फोन लावला असता ते कोणाचाच फोन न उचलण्याचा त्यांनी पिडा घेतला आहे. साहेबांना कधीही फोन करा ते फोन उचलत नसल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. त्याही पलीकडे सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांना फोन केला असता तेही फोन उचलत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याच्या मागेही यांना फोन केला असता हे कधीही फोन उचलत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अक्षरशः त्यांना मेसेज करून सुद्धा ते त्याचा उत्तर देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नक्की पुणे शहरातील पोलीस एकीकडे आणि हडपसर सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे एकीकडे असा प्रकार सध्या पुण्यात पाहायला मिळत आहेत.
तसेच परिमंडळ 5 पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनाही संपर्क केला असता त्यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही. परंतु नागरिकांनी त्यांना याबाबत माहिती दिली आहे. तसेच व्हिडिओ फुटे सुद्धा त्यांना पाठवले आहे त्यावरती त्यांची काहीच प्रतिक्रिया नसल्याचे नागरिकांकडून समजले आहे.
नागरिकांकडून या गोष्टीची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जर कृषी विभागातील सल्लागारांना म्हणजे वरिष्ठ व्यक्तींना जर मदत मिळण्यास एवढा वेळ लागत असेल तर नागरिकांचे कसे व्हायचे यावर सध्या पुण्यात चर्चा सुरू झाल्या आहेत.

यावर आता पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे काय कारवाई करतील याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

Post a Comment

0 Comments