Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पुणे : भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणावर कोयत्याने केला वार ; अल्पवयीन मुलगा ताब्यात...

पुणे : भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणावर कोयत्याने केला वार ; अल्पवयीन मुलगा ताब्यात...

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना फुरसुंगी येथे घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.६) दुपारी एकच्या सुमारास धनगरवाडा हॉटेल, फुरसुंगी येथे घडली आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत शहाबुद्दीन कमरुद्दीन शेख (वय-१९ रा. ढमाळ वस्ती, फुरसुंगी, पुणे) याने हडपसर पोलीस ठाण्यातफिर्याद दिली आहे. पोलिसांनी १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर आयपीसी ३२६ व आर्म अॉक्ट नुसार गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचा मित्र आदित्य मगरव आरोपी यांच्यात भांडण सुरु होते. हे भांडण सोडवण्यासाठी शेख त्याठिकाणी गेला. शेख याने दोघांना 'तुम्हाला अजुन भांडण करायचे आहे का?' असे म्हटले. याचा राग आल्याने अल्पवयीन मुलाने कंबरेला लावलेला कोयता काढला. त्यावेळी शेख हा घबरुन त्या ठिकाणावरुन पळून गेला. आरोपीने त्याचा पाठलाग केला. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी शेख एका दुकानात लपला असता अल्पवयीन मुलाने दुकानात जाऊन शेख याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


Post a Comment

0 Comments