पुणे : सामान्य गुंतवणूकदारांची तब्बल १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुणे स्थित व्हीप्स या समूहाविरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विनोद खुटे या व्यावसायिकाने क्रिप्टो करन्सी, पेमेंट वॉलेट सर्व्हिस आणि परदेशी चलनाचे अवैध व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासाठी त्याने शेकडो गुंतवणूकदारांकडून भारतीय चलनात पैसे गोळा केले होते व गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला २ ते ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दिले होते. विशेष म्हणजे त्याने अमेरिकी डॉलर या चलनामध्ये हा परतावा देण्याचे देखील आमिष दिले होते.
Post a Comment
0 Comments