कोंढवा पोलिसांची उत्तम कामगिरी ; व्यापाऱ्यांना त्रास देण्याऱ्या गुन्हेगारांना चोवीस तासाच्या आत केले अटक...
पुणे :- कोंढवा पोलीस स्टेशन कडील गुन्हा नोंद क्रमांक 1068/2023 भादवी 324, आर्म ॲक्ट 4 (25) मधील आरोपी यांनी कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत फिर्यादी नामे अब्दुल रहीम मुश्ताक अली रा गल्ली नं 3, अशरफ नगर ,कोंढवा, पुणे यांचे ख्वाजा गरीब नवाज बिर्याणी हाऊस या दुकानावर सकाळी 7.30 वा जाऊन बिर्याणी पार्सल का देत नाही या कारणावरून आरोपी १) आयान शेख 19 वर्ष 2) अली शेख 20 वर्ष 3) अर्ष मुलांनी 19 वर्ष या तिघांनी मिळून कोयत्याचा धाक दाखविला तसेच फिर्यादी याचे हातावर कोयत्याने वार केला. यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हाच्या अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशाने लेखाजी शिंदे सहा पोलिस निरीक्षक तपास पथक यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असता, अमोल हिरवे पोलिस हवालदार यांना त्यांचे बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी 1 व 2 हे अलिफ टॉवर समोर मोकळे पटांगणात बसले आहेत. म्हणून सदर ठिकाणी जाऊन त्या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तर पाहिजे आरोपी अर्ष मुलाणी 19 वर्ष याचा शोध सुरू आहे .सदर कामगिरी संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली लेखाजी शिंदे सहा पोलिस निरीक्षक, पोलीस हवालदार हिरवे, पोलीस अंमलदार रत्नपारखी, पो अम रासगे, पो अम मरगळे, पो अम शशांक खाडे तपास पथक कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.
Post a Comment
0 Comments