Type Here to Get Search Results !

सर्वात मोठी बातमी ; केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सुपुत्राने घेतली राजकारणातून अचानक निवृत्ती ; काय आहे नेमकं कारण?

सर्वात मोठी बातमी ; केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सुपुत्राने घेतली राजकारणातून अचानक निवृत्ती ; काय आहे नेमकं कारण?

टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केली आहे.

निलेश राणे यांनी अचानक राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अचानक राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेण्याचं कारणही नीलेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले नीलेश राणे ?

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19 ते 20 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं. कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपमध्ये खूप प्रेम भेटलं आणि भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे, असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे.

मी एक लहान माणूस आहे, पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले. आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही. टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचं नीलेश राणेंनी म्हटलं आहे.Twitter Post Nilesh Rane 

#timesofmaharashtranews #timesofmaharashtra #timesofmaharashtramas

Post a Comment

0 Comments