बीड (प्रतिनिधी अशोक पवार) ;- राज्यातील मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील अनेक दिवसापासून उपोषण करीत आहेत. परंतु दया-माया न्याय नसलेल्या शासनाने अद्याप मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही. राज्यातील मंत्री खासदार व आमदार सभागृहात बोलत नाही. मराठा व कुणबी हे एकच आहेत. त्यांचे नातीगोती एकच आहेत. सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या हक्काच्या मागणीसाठी हा समाज अनेक दिवसापासून आंदोलन करीत आहे. पण या कष्टकरी श्रमजीवी समाजाला न्याय मिळत नाही. याकरिता आता पिंपळवंडी व परिसरात खासदार आमदार व सर्वपक्षीय नेत्याला गाव बंदी केली आहे. खासदार आमदार व पक्षप्रमुखांनी आपले घर ते विधानसभा संसद भवन हा प्रवास चालू ठेवून समाजाला आरक्षण द्यावे. असे बॅनर लावून पिंपळवंडी येथील आर.आर.पाटील चौकात अशोक पवार बाळासाहेब पवार, बद्रीनाथ पवार , प्रशांत पवार , दादा पवार, गजानन बेदरे, ज्ञानेश्वर पवार, तुकाराम पवार, विठ्ठल पवार, बापू पवार ,महादेव सावंत ,ज्ञानेश्वर शिंदे , युवराज बनगे, रामा मोरे, किरण शेळके , जालिंदर पवार , वैजनाथ पवार, माऊली जाधव, भाऊसाहेब जरे, निखिल पवार, गोकुळ पवार, काकासाहेब जाधव, सुरेश पवार, विलास पवार, बबन पवार, राजेंद्र पवार, अमर पवार यांनी व समस्त ग्रामस्थ पिंपळवंडी यांनी केली आहे. समाज संकटात आहे. समाजाला न्याय देणारा नेता प्रशासनात नावलौकिक होणार आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देऊन न्याय द्यावा. अशी अनेक समाज बांधवांची मागणी आहे.
#timesofmaharashtra
Post a Comment
0 Comments