रणबीर कपूर त्याच्या मुलीसाठी चित्रपटांमधून घेणार ब्रेक, रणबीरचा मोठा खुलासा...
मुंबई: रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेला अभिनेता आहे. अॅनिमल हा चित्रपट रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर हा दिसतोय.
विशेष म्हणजे रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. यामुळे रणबीर कपूर याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. रणबीर कपूर याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये.
काही दिवसांपूर्वीच थेट रणबीर कपूर याला ईडीने समन्स पाठवला. ज्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. रणबीर कपूर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये रणबीर कपूर हा काही मोठे खुलासे करताना दिसतोय. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी काही वर्षे एकमेकांना डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला.
रणबीर कपूर याने नुकताच एक अत्यंत मोठा खुलासा केलाय. रणबीर कपूर याने स्पष्ट केले की, तो आता चित्रपटांमधून ब्रेक घेणार आहे. रणबीर कपूर हा सहा महिन्यासाठी ब्रेकवर जाणार आहे. याबद्दल बोलताना रणबीर कपूर हा म्हणाला की, मी पुढील सहा महिने हे फक्त आणि फक्त माझी मुलगी राहा हिला देणार आहे.
Post a Comment
0 Comments