Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

भावाच्या आणि मुलीच्या मदतीने पतीची हत्या; दसऱ्याच्या दिवशी केले पतीला ठार...


भावाच्या आणि मुलीच्या मदतीने पतीची हत्या; दसऱ्याच्या दिवशी केले पतीला ठार... 
चंद्रपूर :- दारू पिऊन सतत वाद घालून पत्नी व मुलीला मारहाण करणाऱ्या पतीस मुलीच्या आणी भावाच्या मदतीने हत्या केल्याची थरारक घटना दसऱ्याच्या दिवशी मंगळवारी शहरातील नगिनाबाग येथे घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी पत्नी मंगला चौधरी, मुलगी जयश्री चौधरी, भाऊ विलास शेंडे याला अटक केली आहे.
त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नीलकंठ चौधरी (५२) असे मृत पतीचे नाव आहे. चंद्रपूर शहरातील नगिनाबागमध्ये राहणारा निलकंठ चौधरी हा मोलमजुरीचे काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होता. त्याला याकामी पत्नी मदत करीत होती. परंतु निलकंठ हा व्यसनाच्या आहारी गेला होता. तो नियमित दारू प्राशन करायचा आणि घरात येऊन पत्नी व मुलींसोबत विविध कारणांवरून भांडण करायचा. पत्नीकडे मंडळी आली की त्यांना शिविगाळ करून हाकलून लावायचा. दसऱ्याच्या दिवशी बहिणीला भेटण्याकरीता मुल तालुक्यातून सुशी दाबगाव येथून भाऊ विलास शेंडे हा आला होता. दरम्यान तो घरी दिसताच निलंकठने साळ्याला अश्लिल भाषेत शिविगाळ सुरू केली. त्यामुळे भांडण सुरू झाले. भांडण वाढत गेल्याने त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले.

नेहमीच घरात भांडण करणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळून संतापलेली पत्नी मंगला व मुलगी व साळ्याने लोखंडी रॉड, काठीने डोक्यावर जबर मारहाण केली. एवढेच नाही तर वरवंटा त्याच्या छातीवर ठेवला. दरम्यान साळा विलास शेंडे यानेच रामनगर पोलिस स्टेशन गाठून माहिती दिली. दरम्यान रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले, नापोशी राहुल सहारे, पोलिस शिपाई देविदास राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला तसेच मृतदेह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून पत्नी, मुलगी, साळा तिघांनाही अटक केली. बुधवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments