Type Here to Get Search Results !

पाटोदा तालुक्यात 16 वर्षाच्या मुलीचा नरबळी देण्यासाठी कटकारस्थान ; पुण्यात होणार होता नरबळी ; पुण्यातील दिगजांचा समावेश असण्याची शक्यता ?


पाटोदा तालुक्यात 16 वर्षाच्या मुलीचा नरबळी देण्यासाठी कटकारस्थान ; पुण्यात होणार होता नरबळी ; पुण्यातील दिगजांचा समावेश असण्याची शक्यता ?

बुवाबाजी करणाऱ्या दादाराव घोशीर विरुद्ध अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

बीड (अशोक पवार) :- पाटोदा तालुक्यातील कोतन येथे अंध्दश्रद्धेपोटी पैशाचे अमिष दाखवून धन काढण्यासाठी तुझी सोळा वर्षीची मुलगी नरबळीसाठी दे, तसेच सदरील घटना कोणाला सांगितल्यास तुमच्या घराला नष्ट करुत अथवा गावात राहु देणार नाहीत असा दम तांत्रिकाने दिल्याने भयभित कुटुंबाने अंमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मांतत्रिका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतन येथे भाऊसाहेब गवरकर आणि त्यांचे कुटुंब गुन्या गोविंदाने राहत असतानाच त्यांच्या सुखी कुटुंबाला एका मांत्रिकाची दृष्ट लागली. मांत्रिकाने त्यांच्या घरी जाऊन तुमची मुलगी सोळा वर्षाची आहे. तिची नरबळी द्यायचा आहे. त्यासाठी तिच्या अंगावर अनेक सोने घातले जाणार असुन ते सोने नरबळी नंतर तुम्हाला मिळेल, असे सांगत ही बाब कोणाला सांगु नकोस नसता तुझ्या घरदाराला नष्ट करील, गावात राहु देणार नाही अशा धमक्या देण्यात आल्या. या प्रकाराने सर्व गरवकर कुटुंब दहशतीखाली असुन त्यांनी सर्व प्रकार गावातील ग्रामस्थांच्या लक्षात आणुन दिला. त्यानंतर गावातील दोनशे ग्रामस्थ अंमळनेर पोलीस ठाण्यात येऊन या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.रात्री उशिरा दादाराव रघुनाथ घोशीर या मांत्रिकाविरुद्ध १२९/२०२३ कलम ३ महाराष्ट्र नरबळी व जादुटोना प्रतिबंधक अधिनियम २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन सदरील मांत्रिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती स.पो.नि.चंद्रकांत गोसावी यांनी दिली. सदरील नरबळी पुणे येथे दिला जाणार होता त्यामुळे यामध्ये किती जणांचा समावेश आहे हे उघड करण्याचे मोठे आवाहन असुन नरबळीचे रँकटच असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. सदरील मांत्रिक गेल्या अनेक वर्षांपासून असे कृत्ये करित असुन यापुर्वी काही नरबळीचे प्रकार घडले आहेत का? याची सुद्धा चौकशी यानिमित्ताने होणार आहे. एकंदरीत पुणे येथे नरबळी होणार असल्याने यामध्ये अनेकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. पुणे येथे कोणाकडे जाणार होते, किती धन काढुन देणार होते.या प्रश्नांची उकल चौकशी अंती होणार आहे.एका जागृत पालकामुळे एका सोळा वर्षाच्या मुलीचा जीव वाचल्यामुळे पालकाचे कौतुक होत असुन या मांत्रिकाविरुद्ध कठोर कार्यवाही करावी अशी मागणी कोतन ग्रामस्थांनी केली असून या पुढे असे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी शासनाने घ्यावी.अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.सदरील प्रकाराची चौकशी अंध्दश्रद्धा निर्मूलन समितीने देखील करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मांत्रिक सावधपणे उचलीत होता पाऊले...
मांत्रिकाने मोबाईल हिसकावून घेतला जेंव्हा सदरील मांत्रिक गरवकर यांच्या घरी गेला होता तेंव्हा त्याने गरवकर यांच्या जवळील मोबाईल दोनदा हिसकावून घेतला, संवाद  होईपर्यंत मोबाईल मांडीखाली दाबून ठेवला. संवादानंतर घरा बाहेर पडल्यावर त्याने मोबाईल दिला. म्हणजे सदरील मांत्रिक सावधपणे पाऊले उचलीत होता .सदरील घटना कोणाला कळु नये याची खबरदारी घेत होता. असे भाऊसाहेब गरवकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments