Type Here to Get Search Results !

कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर तृतीयपंथीला बिअरच्या बाटलीने मारहाण, पिंपरीतील घटना


कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर तृतीयपंथीला बिअरच्या बाटलीने 
मारहाण, पिंपरीतील घटना...

पिंपरी : महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षाच्या प्रतीक्षेत थांबल्याच्या कारणावरून तीन ते चार जणांनी तृतीयपंथीला बिअरच्या बाटलीने मारून जखमी केले. दिघीतील आळंदी रोड परिसरातील ए.

आय. टी. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी (दि. २९) रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली.

अक्षय ऊर्फ जोया हजेरी (२३, रा. येरवडा) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ३०) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. माेन्या माने (रा. दिघी) व त्याच्या सोबतच्या तीन अनोळखी इसमांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अक्षय हजेरी हे तृतीयपंथी आहेत. अक्षय हे त्यांच्या तृतीयपंथी मैत्रिणींसोबत रिक्षाच्या प्रतीक्षेत थांबले होते. यावेळी मोन्या व त्याचे साथीदार तिथे आले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षाच्या प्रतीक्षेत थांबल्याच्या कारणावरून चिडून बिअरच्या बाटलीने फिर्यादी अक्षय यांच्या डोक्यात मारून तसेच चाकूने कमरेवर वार करत जखमी केले. हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तृतीयपंथी मैत्रिणींनादेखील मोन्या आणि त्याच्या सोबतच्या अनोळखी इसमांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.


Post a Comment

0 Comments