राागडमध्ये अपघाताची मोठी घटना घडली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली हद्दीत रुग्णवाहिकेत स्फोट झालाय. यामध्ये रुग्णवाहीकेचा जळून पूर्णत: कोळसा झालाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा')
मिळालेल्या अधिक माहितीनुसार रुग्णवाहिका एका महिला रुग्णाला घेऊन मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी पुणे लेनवर असताना रुग्णवाहिका बंद पडली. वाहन चालकाने खाली उतरुण बिघाड दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णावाहिका काही दुरुस्त होऊ शकली नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्ण महिलेसह अन्य व्यक्तींना खाली उतरवण्यात आले.
रुग्णवाहिकेतून सर्वजण खाली उतरल्यावर अचानक गाडी रिवर्स जाऊ लागली. रिवर्स गेल्यानंतर थोड्या अंतरावर जाऊन या रुग्णवाहिकेचा भीषण स्फोट झाला. यामध्ये उपचार वेळेवर न मिळाल्याने रुग्ण महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. झालेल्या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
अपघात झाला तेव्हा पुणे लेनवर मोठी वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. येथे आल्यावर महिलेला दुसऱ्या नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून महिलेचा आधिच मृत्यू झाल्याचे सांगितले. रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची वाहने देखील घटनास्थळी दाखल झाली होती. मात्र तोपर्यंत रुग्णवाहिकेचा जळून कोळसा झाला होता.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्यामध्ये सुदैवाने पोलीस कर्मचारी आणि बचाव दलातील सदस्य बचावले मात्र एका पोलीस कर्मचाऱ्यांचे वाहन (दुचाकी) Star खाक झाली आहे.
Post a Comment
0 Comments