Type Here to Get Search Results !

अतिक्रमण विभागाचा पोलिसांबरोबर कोंढाव्यात झाला वाद ; पत्रकारांचा मोबाईल अतिक्रमण कर्मचाऱ्यांकडून हिसकावून घेण्याचा प्रकार ?

अतिक्रमण विभागाचा पोलिसांबरोबर कोंढाव्यात झाला वाद ; पत्रकारांचा मोबाईल अतिक्रमण कर्मचाऱ्यांकडून हिसकावून घेण्याचा प्रकार ?

पुणे :- पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये साईबाबा नगर येथे पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केले. त्या ठिकाणी नागरिकांचा मोठा जमाव जमल्याचे चित्र दिसले. त्यातच अतिक्रमण विभागात असलेले पोलीस आणि अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी यांच्यात वाद झाल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळाले. त्या ठिकाणी असलेले अनेक अतिक्रमणे पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईत काढले असल्याचे दिसले.
                       👇👇  पहा व्हिडीओ👇👇
                      👆👆 पहा व्हिडीओ👆👆
यामध्ये अतिक्रमण विभागाचे पोलिसांनी वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण अधिकाऱ्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाच उडवा उडवीचे उत्तर असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. अतिक्रमण अधिकारी रणजित जाधव व कर्मचारी हे पोलिसांनाच विचारात होते की तुम्ही कोण अधिकारी आहात का ? अतिक्रमण कर्मचारी व अधिकारी यांना कदाचित पोलिस खाकी वर्दी घालतो हे कदाचित माहिती नसेल. तसेच यामध्ये अतिक्रमण विभागाला दिलेल्या पोलिसांचे आणि अतिक्रमण अधिकारी यांच्यात वाद झाल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळाले. त्यानंतर पोलिसांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्हाला फोन लावून द्या तुम्ही कारवाई करताना चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहात. त्यावर त्यांनी उडवा उडवी चे उत्तर दिले असल्याचे व पोलिसांवर काही सुरक्षा रक्षक आणि मसुबचे कर्मचारी शकिर शेख हसत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 
यात आता प्रश्न असा उद्भवला आहे की अतिक्रमण विभागात असलेले पोलीस जर अतिक्रमण विभागाच्याच कामावर ठपका ठेवत असतील तर नक्कीच चाललय तरी काय ? 

पत्रकारांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रकार...
तसेच त्या ठिकाणी जशी अतिक्रमण विभागाची कामकाज सुरू होते तसेच पत्रकारांचे काम आहे की त्यांनी त्याचे व्हिडिओ फोटोज घेणे आणि बातमी बनविणे. तेथे असलेले पत्रकार व्हिडिओ बनवत असताना त्यांच्याकडून अतिक्रमण कारवाईत आलेल्या कर्मचाऱ्यांनी मोबाईल हिसकावून घेतल्याचे प्रकार घडले आहे. यावर पत्रकारांनी अतिक्रमण कर्मचारी व अधिकाऱ्यांवर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यामुळे आता प्रश्न असा पडलाय की पुणे महानगरपालिकेतील कर्मचारी कोणाला घाबरत नाही असे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत.

Post a Comment

0 Comments