पुणे,(संपादक मुज्जम्मील शेख) :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी राजस्थानचे सतीश काटरवाडा यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिले आहे. सतीश काटरवाडा हे राजस्थान राज्यातील दौसा जिल्ह्यात राहतात.
सतीश काटरवाडा यांनी मागील युवक कार्यकारणी राष्ट्रीय सरचिटणीस पदावर काम पाहिले होते. तसेच त्यांनी विद्यार्थी चळवळीपासून ते पक्षात कार्यरत आहेत. गेल्या अनेक पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी 2022 साली उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार के के शर्मा यांच्या निवडणूकित खूप चांगल्या पद्धतीने काम केले. के के शर्मा हे सध्या अजित पवार गटात राष्ट्रीय सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. सतीश काटरवाडा हे के के शर्मा यांचे निकटवर्गीय मानले जातात. काटरवाडा यांना निवडीनंतर अनेक राज्यातून त्यांना शुभेच्छा मिळाले आहे.
निवड झाल्यानंतर काय बोलले काटरवाडा ?
निवड झाल्यानंतर आमच्या संपादकांनी सतीश काटरवाडा यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी सांगितले की, मला पक्षाने जे जबाबदारी दिली आहे. त्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा आभारी आहे. त्यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्याला मी सार्थ पणे पार पाडणार आहे. आणि जे पक्षासाठी अजित पवारांच्या आणि प्रफुल पटेल यांच्या विचारावर त्यांना पक्षात संधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच लवकरच राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करणार आहे यामध्ये जे पक्षा साठी चांगलं काम करेल त्यांना जबाबदारी देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Post a Comment
0 Comments