Type Here to Get Search Results !

अवघ्या तीन दिवसांत १० हजार पेक्षा जास्त महिलांनी केली "महिला सम्मान बचत पत्र" योजनेत ३९ कोटी रुपयांची गुंतवणूक...

अवघ्या तीन दिवसांत १० हजार पेक्षा जास्त महिलांनी केली "महिला सम्मान बचत पत्र" योजनेत ३९ कोटी रुपयांची गुंतवणूक...

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), केंद्र शासनाने २०२३- २०२४ च्या अर्थ संकल्पात महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी, दोन वर्षे या अल्प मुदतीसाठी महिला सम्मान बचत पत्र" ही बचत योजना जाहीर केली आहे. सदर योजना अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत लाभ दायक ठरली आहे.

भारतीय डाक विभागाच्या पुणे शहर पूर्व विभागाने दिनांक २३.०६.२०२३ ते २६.०६, २०२३ असे तीन दिवसांचे "महिला सम्मान बचत पत्र" योजने अंतर्गत १०,००० खाती उघडण्यासाठी विशेष अभियान राबविले. पुणे शहर पूर्व विभागातील ६५ पोस्ट ऑफिसेस मधील सर्व कर्मचारी हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रचंड उत्साहाने दिनांक २४ जून शनिवारी पहाटे पासूनच सहभागी झाले. महिलांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाने आणि सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सांधिक प्रयत्नातून, या तीन दिवसात १०४२९ महिला गुंतवणूकदारांनी "महिला सम्मान बचत पत्र" खाती उघडली.

काय आहे हि "महिला सम्मान बचत पत्र" योजना ?
१. सदर योजनेसाठी महिला व मुलींसाठी उपलब्ध कोणतीही वयोमर्यादा नाही. 
२. सदर योजना दोन वर्षासाठी असून व्याज ७.५% चक्रवाढ पद्धतीने मिळेल.
३. एका खात्यात किमान रुपये १,०००/- व कमाल रुपये २,००,०००/- गुंतवता येतील. 
४. सदर योजनेत एका खात्यात एकच Deposit करता येणार असल्याने, दुसरे खाते, तीन महिन्याच्या अंतराने उघडता येईल. एका खातेदारास सर्व खाते मिळून कमाल रुपये २,००,०००/- गुंतवता येतील. 
५. एक वर्ष झाल्यानंतर खात्यातून ४०% रक्कम एकदा काढता येईल. 
६. अपवादात्मक परिस्थितीत मुदत पूर्व खाते बंद करण्याची सोय.

महिला सम्मान बचत पत्र" योजना हि केंद्र शासनाधित मान्यताप्राप्त, संपूर्ण सुरक्षित, उच्च व्याज दर असलेली विशेषतः महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. त्यामुळे, या योजनेस पुणे शहरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या प्रचारासाठी, कर्मचारी वर्गाबरोबर विविध स्वयंसेवी व शैक्षणिक संस्था. महिला बचत गट, विभागीय आयुक्त कार्यालय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी पुणे विभागाचे पोस्ट मास्टर कुलकर्णी व त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. अभिजित इचकेप्रवर अधिक्षक डाकघर, पुणे शहर पूर्व विभाग,

Post a Comment

0 Comments