Type Here to Get Search Results !

Add

Add

सावधान विनातिकीट रेल्वे स्थानकात फिरणाऱ्यांवर “तेजस स्क्वॅाडची “नजर ; पुणे लोहमार्ग पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी केली रेल्वे स्थानकात पाहणी...


सावधान विनातिकीट रेल्वे स्थानकात फिरणाऱ्यांवर “तेजस स्क्वॅाडची “नजर ; पुणे लोहमार्ग पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी केली रेल्वे स्थानकात पाहणी...

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), पुणे लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल तसेच तिकीट तपासणीस अधिकारी टीसी यांनी पुणे रेल्वे स्टेशन प्लॅटफार्म, वेटींग रुम, बुकिंग परिसरात विनातिकीट फिरणाऱ्या लोकांना शोधून त्यांचेवर कारवाई करण्याचा धडाका सुरु केलेला आहे.
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात तसेच चालू रेल्वेत गुन्हे करणारे बरेच गुन्हेगार विनातिकीट प्रवास करत असल्याचे लोहमार्ग पोलीसांना व रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले असल्याने “तेजस स्क्वॅाड" ची निर्मिती करण्यात आली आहे.
दररोजच्या गर्दीच्या वेळी तेजस स्क्वॅाड त्यामध्ये पुणे लोहमार्ग पोलीस (GRP), रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि टीसी यांचे मदतीने विनातिकीट फिरणारे शोधून त्यांचेवर धडक कारवाई करणे चालू केले आहे. त्यामुळे गुन्ह्यांना बऱ्याच प्रमाणात आळा बसणार आहे. असे पुणे लोहमार्ग पोलीस दलाचे (SPपोलीस अधिक्षक (भापोसे) श्रीकांत धिवरे यांनी सांगितले आहे. 
या पाहणीमध्ये विभागीय वाणिज्य प्रबंधक (डीसीएम) रामदास भिसे, स्टेशन डायरेक्टर मदनलाल मीना, पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा वरीष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक बी एस रघुवंशी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments