पुणे :- देशातील 58 कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक जाहीर झाली असताना पुणे शहरात मध्यवर्ती येत असलेले पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड यातील इच्छुक उमेदवारांची घोडदौड सुरू झाली आहे. यासाठी इच्छुकांनी अनेक पक्षाकडे तिकीट मागणीसाठी चांगलीच फिल्डिंग लावली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी असे अनेक पक्ष या ठिकाणी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची आघाडी होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु यामध्ये संबंधित पक्षाचे उमेदवार आघाडी बाबतीत नाखुश असल्याचे पाहायला मिळत आहे. आघाडी झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांना पत्ता कट होईल याची भीती उमेदवारांमध्ये सध्या दिसत आहे. तसेच अनेकांनी "कलाटे पॅटर्न" करणार असल्याचेही सांगितले आहे.
कोणत्या कोणत्या वार्डात होईल चुरस ?
वार्ड 3 मध्ये सर्वात जास्त चुरस होणार असल्याचे चित्र दिसत आहेत यामध्ये अनेक उमेदवार आपली प्रतिष्ठा पणाला लावून या वार्डात निवडणूक लढणार असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. काँग्रेस पक्षाकडून 4 उमेदवार इच्छुक असून यापैकी कोण बंडखोरी करेल या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वार्ड क्रमांक 7 मध्ये ही एकाच कुटुंबातून दोन उमेदवार वेगवेगळ्या पक्षातून आपली प्रतिष्ठा पणाला लावून आहेत.
राष्ट्रवादी तर्फे संतोष कवडे तसेच काँग्रेस तर्फे संजय कवडे या दोघांनीही चांगलीच फिल्डिंग लावली असल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच वार्ड क्रमांक 8 मध्ये जर आघाडी झाली तर आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता असल्याचे सध्या चित्र स्पष्ट दिसत आहेत. कारण या भागात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाकडून इच्छुकांमध्ये वातावरण तापल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट या भागात आठ वाडा पैकी फक्त वार्ड क्रमांक 8 मध्ये जावेद खान यांच्या साठी फक्त एक तिकीट मागत असल्याने महाविकास आघाडीकडे मोठी तारांबळ झाल्याचे चित्र उद्भवले आहे. कारण त्या प्रभागात काँग्रेसचे मंजूर शेख हे मागील काळात नगरसेवक होते.
Post a Comment
0 Comments