Type Here to Get Search Results !

डेक्कन क्वीन गाडीत पास धारकांची पुणे मुंबई प्रवास दरम्यान दादागिरी ; टीटीई सुद्धा झालेत त्रस्त...

डेक्कन क्वीन गाडीत पास धारकांची पुणे मुंबई प्रवास दरम्यान दादागिरी ; टीटीई सुद्धा झालेत त्रस्त...
पुणे ;- (प्रतिनिधी शाबाज शेख), काही दिवसांपूर्वीच भारतीय रेल विभागाने नवीन रेल्वेची सुरुवात केली. प्रवाश्यांना सुविधा अधिक चांगल्या दर्जाचे मिळावी यासाठी प्रयत्न केले होते परंतु यातच काही दररोज प्रवास करणारे पास धारक या रेल्वेत अक्षरशः त्यांची दादागिरीच असल्याचा प्रकार समोर आला आहे. 13 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजून 15 मिनिटांची डेक्कन क्वीन एक्सप्रेस मध्ये डब्बा क्रमांक D6 मध्ये काही नागरिक आणि आमचे प्रतिनिधी प्रवेश करत असताना D6 मधील पास धारकांनी नागरिकांना आणि आमच्या प्रतिनिधींना धक्का बुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी त्यांना सांगितले की पत्रकार आहे तर त्या पास धारकांनी सांगितले की, या डब्यात कुणालाही प्रवेश नाही तुम्हाला कोणाला जाऊन तक्रार द्यायचे असेल त्याला द्या टी टी कडे जा आरपीएफ कडे जा आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांना आमच्या प्रतिनिधीने विनवणी केली की मला प्रवेश तरी करू द्या मी इथून दुसऱ्या डब्यात जातो परंतु त्या पास धारकांनी ऐकून न घेण्याचे ठरवले होते. आणि धक्का बुक्की केला असल्याचे भयंकर प्रकार घडला आहे. ह्या सर्व प्रकरणाची तक्रार टीटीई यांच्याकडे केली असता तसेच त्यांना D6 या डब्या बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की तो डबा अनारक्षित लोकांसाठीच आहे आणि सदर टीटीई यांनी सांगितले की, आम्हाला देखील या पास धारकांचा दररोज नाहक त्रास भोगावा लागत आहे. आम्हाला देखील ते धमकावत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यानंतर त्यांनी सांगितले की आपण डबा क्रमांक D2, 3, 4 यामध्ये आमचे सहकारी त्या ठिकाणी असतील त्यांना आपण जाऊन भेटा ते आपल्याला काहीतरी मदत करतील. परंतु डेक्कन क्वीन या गाडीमध्ये मागच्या बाजूला दोन डबे आणि पुढे एक डबा असे एकूण तीन डबे अनारक्षित आहेत आणि त्यापैकी एक डबा हा एमएसटी साठी असल्याची बतावणी करत हे पास धारक नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार करत आहे. कदाचित यामध्ये कधी एखादा वृद्ध व्यक्ती पडला तर किती महागात पडेल. तसेच त्या ठिकाणी असलेले नागरिकांनी सुद्धा या गोष्टीची खंत व्यक्त केली. अशा पास धारकांवर तात्काळ गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे असे तेथील नागरिकांची मागणी होती.
परंतु यावर आता भारतीय रेल्वे कोणती कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Post a Comment

0 Comments