पुणे :- देशातील वाहतुकीची समस्या ही जनतेच्या वाहनचालकांच्या दृष्टीने गंभीर समस्या होत आहे, यासाठी विद्यार्थी दशेतच वाहतुकीच्या नियमांची माहिती दिल्यास भविष्यात जबाबदार वाहनचालक व दक्ष नागरिक निर्माण होऊ शकतील, असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) मंदार जवळे यांनी नारायणगाव येथे व्यक्त केले. व अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर व आंबेगाव तालुका, अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन जुन्नर तहसील यांच्या विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या औचित्य साधून ग्राहक सप्ताह समारोप समारंभ निमित्ताने ग्राहक ग्राहक कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंदार जावळे हे बोलत होते. यावेळी जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, ग्राहक पंचायतीचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी, ग्राहक पंचायतीचे अभ्यास मंडल प्रमुख तुषार झेंडे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, पर्यावरण समितीप्रमुख ज्ञानेश्वर मुंडे, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर, महिला जिल्हा संघटक वैशाली आडसरे, तालुकाध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, आंबेगाव तालुका संघटक देवीदास काळे, शैलेश कुलकर्णी, सुभाष मावकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतीचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी हे होते. यावेळी ग्राहक पंचायतीच्या कार्याची माहिती सांगणारी पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थिती करण्यात आले. यावेळी तुषार झेंडे पाटील, बाळासाहेब आवटे, अनिल तात्या मेहेर, ज्ञानेश्वर, नीलेश बुधवंत आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अशोक भोर यांनी तर सूत्रसंचालन वैशाली आडसरे यांनी केले.
वाहतूक नियमांची जागृती विद्यार्थी दशेतच व्हायला हवी : DYSP उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे
January 17, 2023
0
वाहतूक नियमांची जागृती विद्यार्थी दशेतच व्हायला हवी : DYSP उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे
Post a Comment
0 Comments