पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवक सेलची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. या कार्यकारिणीत पदांसाठी मोठ्ठी रस्सीखेच लागली असल्याचे पाहायला मिळाले. त्यातच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काहींना धक्का तर काहींना सुखद धक्का बसला आहे. या कार्यकारिणीत काही नवीन चेहऱ्यांना देखील संधी प्राप्त झाली आहे. त्यामध्येच पुण्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते जावेद ईनामदार यांना यात संधी मिळाली आहे. जावेद ईनामदार हे सामाजिक कार्यात सक्रिय असतात. त्यांनी कोरोना काळात मास्क वाटप, सॅनिटायजर वाटप, रेशन किट वाटप असे अनेक उपक्रम राबविले आहे. जावेद ईनामदार हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या जवळीक मानले जातात तसेच त्यांचा दांडगा जनसंपर्क संपूर्ण देश भरात आहे. तसेच ते सातत्याने धीरज शर्मा यांच्या बरोबर अन्य राज्यातील दौऱ्यांमध्ये असतात. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून 3 युवकांना संधी मिळाली आहे. औरंगाबादचे अमीर जेतपुरवाला आणि ठाण्याचे नजीब मुल्ला यांचे निकटवर्तीय मोहसीन शेख यांना यामध्ये पुन्हा संधी मिळाली आहे. धीरज शर्मा यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार ही कार्यकारिणी तयार केली आहे.
कोणाकोणाला मिळाली संधी ?
राष्ट्रीय उपाध्यक्ष :-
अफजल कुंजुमान
मुरली मनोहर पांडे
सरचिटणीस :-
अमीर जेतपूरवाला
सुमित सुशीलन
अरफा कोया
जानकी पांडे
मोहसीन शेख
सोहन सहादेवन
सचिव :-
अमित वशिस्त
ऋषी किलाम
आनंद उप्रेती
सौरभ आहुजा
एम. जुबेर खान
डॉ.पवन पांडे
श्याम सिंह
विजय दीक्षित
मोहम्मद निसार
थाबीबुल आलम
सदकथुल्ला पी
अहतराम हक
कार्यकारी परिषद सदस्य :-
नरेश कुमार
स्वाती प्रभाकर
अत्तार नवाब
राज पुरण आचार्य
शिववर्धन शर्मा
जाफर सादिक
अफसर खान
थंगाकोया थांगल
फयास खान
कार्यकारिणी सदस्य :-
जावेद इनामदार
अफजल कुंजुमन
मुरली मनोहर पांडे
आमेर जेतपुरवाला
सुमीत सुशीलन
मोहसीन शेख
जानकी पांडे
नरेश कुमार
प्रवक्ता :-
मुरली मनोहर पांडे
ऋषी किलाम
सौरभ अहुजा
मीडिया समन्वयक :-
झी शान
शिस्तपालन समिती :-
अफजल कुंजुमान
मुरली मनोहर पांडे
सुमित सुशीलन
जानकी पांडे
नरेश कुमार
Post a Comment
0 Comments