पुणे शहर वाहतूक विभागकडे नो पार्किंगमधील गाड्या उचलण्यासाठी असलेल्या विदर्भ इन्फोटेक कंपनीच्या सब कंत्राटदार सायली एंटरप्राइजेसच्या कर्मचाऱ्यांनी गाडी सोडण्यासाठी कोरेगाव पार्क ट्रॅफिक येथे मागितली लाच...
पुणे शहर वाहतुक विभागकडे नो पार्किंगमधील गाड्या उचलण्यासाठी असलेल्या विदर्भ इन्फोटेक कंपनीच्या सब कंत्राटदार सायली एंटरप्राइजेसच्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागन्याचे प्रकार कोरेगाव पार्क वाहतूक पोलीस विभाग येथे उघड झाले आहे. मंगळवारी (३० नोव्हेंबर) संध्याकाळी ०५:०० वाजताच्या वेळीस काही अनुचित प्रकार घडला आहे. त्यामध्ये एका नागरिकाचे वाहन कोरेगाव पार्क या ठिकाणी नो पार्किंग मध्ये उचलण्यात आले होते. त्या ठिकाणी ते वाहन उचलत असताना कुठलेही सूचना न देता उचलले गेले होते. वाहन चालक गाडी उचलत असताना तातडीने त्या ठिकाणी आले, त्यानंतर त्यांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला गाडी सोडण्यास विनवणी केली होती. परंतु त्यांनी गाडी मालकाला सांगितले की, आपण वाहतूक पोलीस स्टेशनला सर्किट हाऊस येऊन गाडी घेऊन जावा. यानंतर वाहनचाकाने त्या टेम्पोवर काम करत असलेले विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाला सांगितले की, हे 786 आणि पूर्वीचा दंड 500 रुपये आहे. टोटल 1286 रुपये आहेत. तुम्ही 1 हजार रुपये द्या मी गाडी सोडतो. अशाप्रकारे लाच मागण्यात आली आहे. यानंतर ही गाडी कोरेगाव पार्क वाहतूक विभागात नेण्यात आली. त्या ठिकाणी पत्रकार दाखल झाले असता. या गोष्टीची माहिती गाडीमालकाने पत्रकारांना दिले. आणि त्या गाडीमालकाने पत्रकारांना व्हिडिओ काढून सर्व घटनेची माहिती दिली. पुणे शहरात अशाप्रकारे भ्रष्टाचाराचा मोठा आणि सुसाट धंदा विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सुरू आहे.
या संदर्भात विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड याचे सब कंत्राटदार सायली एंटरप्राइजेसचे मालक यांना या विषया संदर्भात संपर्क झाला असता त्यांनी त्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.
परंतु पुणे शहरात वाहतूक विभागाचे 27 विभाग आहेत. त्यामध्ये एका विभागात जवळपास 10 मुले काम करत आहेत. याचा अर्थ असा की, संपुर्ण शहरात साधारणपणे 200 पेक्षा जास्त मुले कामाला आहेत. या मुलांकडून अशा घटना सातत्याने घडत आहेत. यामध्ये प्रश्न असा उद्भवतोय की हा पैसा नक्कीच जातोय कुणाकडे ? विदर्भ इन्फोटेक कंपनीकडे सायली एंटरप्राइजेसचे मालक यांच्याकडे की, वाहतुक पोलीसकडे हे प्रश्न निर्माण झाले आहे. तसेच अश्या अनेक तक्रारी मागील काळात नागरिकांनी केलेल्या असल्याचे सांगितले जात आहे.
या संदर्भात पुणे शहर पोलीस आयुक्त आणि वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजय मगर हे या प्रकरणात काय कारवाई करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
Post a Comment
0 Comments