Type Here to Get Search Results !

दौंड तालुक्यातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अविनाश तिखे यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार...

दौंड तालुक्यातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अविनाश तिखे यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार...
पुणे :- पंचायत समिती दौंड येथे मागील दोन वर्षात विशेष करून कोरोना काळात परप्रांतीय व ऊसतोड मजूर, स्थलांतरीत नागरीकांना मोफत अन्न धान्य वाटप, वैद्यकीय सुविधा पुरविणे व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे यांचेकडील सर्व योजना प्रभावीपणे राबविणे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडील प्रोसेस मॅपिंग व अभिलेख वर्गीकरणची अंमलबजावणी प्रभावीपणे केली तसेच, प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्यामुळे दौंड तालुक्यातील अविनाश तिखे कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती दौंड
व माणिक काटे वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती दौंड यांना सन 2020-21 करीता गुणवंत अधिकारी जिल्हास्तरीय पुरस्कार पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या शुभहस्ते 15 ऑगस्ट 2022 रोजी प्रदान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments