पुणे :- "द वर्ल्ड ऑफ ब्लेसिंग्ज" हा उपक्रम नन्हा ज्ञान फाऊंडेशन आणि स्व इटर्नल द्वारे सुरु करण्यात आला असून 20 ऑगस्ट 2022 रोजी ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा येथे "उम्मीद अवॅर्डस्" हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता.
साहित्य, कला, उद्योजकता, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि इतर अनेक क्षेत्रांत ज्यांनी आपल्या अपंगत्वाला आपले सामर्थ्य बनवले आहे आणि ज्यांनी आपले कर्तृत्व गाजवले आहे अशा भारता भरातील व्यक्तींना ओळखण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. ऑटिझम, एडीएचडी, लर्निंग डिसॅबिलिटी, सेलेब्रल पाल्सी, पॅरालिसिस, ऑर्थोपेडिक डिसॅबिलिटी, व्हिज्युअल इम्पेरेमेंट, डाऊन्स सिंड्रोम, एमएमएल इत्यादीशी झुंज देऊन आपल्या हिमतीवर आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेल्या 25 व्यक्तींचा सत्कार समारंभात करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त पुणे शहर आणि अमित श्रीदार, संस्थापक आणि सीईओ गाके सोल्युशन्स, तसेच रुपाली ढमढेरे मुख्याध्यापिका, ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल कोंढवा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आज समावेशन निर्मितीबद्दल बरेचसे बोलण्यात येते, अशातच रोमल सुराना, संस्थापक, नन्हा ग्यान फाउंडेशन आणि गायत्री छाडवा, संस्थापक, स्व इटर्नल यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात प्रत्येक व्यक्तीचा आदर केला गेला आणि ते कोण आहेत यासाठी स्वीकारले गेले तसेच उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाबद्दल बोलण्यासाठी सुरक्षित जागा म्हणून चिन्हांकित केले.
अभिनव रंगनाथन, पूजा बालोट, आकांक्षा पाटील, अक्षया श्रीनिवासन, स्वाती नलावडे, आर्यन देशपांडे, जयती घोष, ज्ञानेश्वरी सोनवणे, निशिगंधा गोवर्धन, टी. व्ही. ऐश्वर्या, आनंदिता कुमार, श्रेया गाढवे, सार्थ बुच, हर्ष बाबर, कृष्णा शेट, अंशू मजूमदार, गौतमी वाघ, डॉ. अलविते सिंग निंगथौजम, जुही इदनानी, सुरेखा गायकवाड, विनायक जाधव, विनोद कदम, भगवान वावळे आणि मोहम्मद शेख आणि विवान मंडोरा यांचा या कार्यक्रमात त्यांच्या कामगिरीबद्दल आणि कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
रिदान जैन आणि देव भेडा यांना त्यांच्या समाजातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नन्हा ग्यान फाऊंडेशनने नेहमीच व्यक्तींना त्यांच्या सर्वांगीण विकासात मदत करण्याचे काम केले आहे आणि आम्ही प्रदान केलेल्या विविध कार्यशाळा आणि सेवांद्वारे त्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आहे. स्व इटर्नल सर्व व्यक्तींसाठी मानसिक आणि भावनिक कल्याण, विशेष गरजा शिक्षण आणि मानवी हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
या कार्यक्रमाला व्हेन्यू पार्टनर रुपाली धामढेरे, मुख्याध्यापिका, ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा यांचे सहकार्य लाभले.
कम्युनिटी पार्टनर सेजल रे संस्थापक तारे जमीन पर, जिग्ना प्रसाद मालवणकर संस्थापक बुकहोलिक, नोएला कांबळी संस्थापक लेडी बर्ड इव्हेंट, फूड प्रायोजक संगीता झवेरी, संस्थापक बचपन प्रीस्कूल, गिफ्टिंग प्रायोजक निधी भंडारी, संस्थापक माइंड लान्सर आणि इग्नाइट इंडिया, आबोली रुइकर, संस्थापक पाठशाला प्रीस्कूल, प्रिंटिंग पार्टनर YoPrintz, बातम्या आणि मीडिया पार्टनर CM News, Mahaj Times आणि Stay Featured यांचे सहकार्य देखील या कार्यक्रमाला लाभले.
Post a Comment
0 Comments