Type Here to Get Search Results !

कोंढवा पोलिसांची उत्तम कामगिरी ; खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना ४ तासात केले जेरबंद...

कोंढवा पोलिसांची उत्तम कामगिरी ; खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना ४ तासात केले जेरबंद...

पुणे :- १४ जून दुपारी ०२.३० वा. च्या सुमारास ज्योती चौकाचे बाजुला स्मशानभुमीजवळ असलेल्या पारसी मैदानात कोंढवा खुर्द पुणे येथे दारू पिण्याचे कारणावरून झालेल्या भांडणातून इसम नामे नितीन चंद्रकांत घोडके, वय ३५ वर्षे, रा. कॅपिटल मॉल समोर, भिमनगर, साईबाबा मंदिर शेजारी, कोंढवा खुर्द पुणे यास इसम नामे १) हरेष अरूण जगताप, वय ३३ वर्षे, रा. स.नं. १३/५, भिमनगर, कोंढवा खुर्द पुणे व २) नितीन रामभाऊ टिकोळे, वय ३९ वर्षे, रा. कुंजीरवाडा, भैरवनाथ तालीम मागे, कोंढवा खुर्द पुणे यांनी दगडाने तसेच लाकडी बांबुने मारहाण करून गंभिर जखमी करून त्याचा निर्घुन खुन केल्या प्रकरणी दि. १५/०६/२०२२ रोजी सायंकाळी ०५:३३ वा गु.र.नं. ६०७/२०२२ भादवि कलम ३०२,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपींचा कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व टिम मधिल सहकारी शोध घेत असताना पोहवा/११६१ सतिश चव्हाण व पो.अं./८८७१ ठोंबरे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी नितीन टिकोळे व हरेश अरूण जगताप हे हांडेवाडी रोड येथे येणार असून ते दोघे सदरचा गुन्हा करून पळून जात आहेत. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांनी स्टाफसह सदर ठिकणी जावून सापळा रचून पळून जाणाया दोन्ही ताब्यात घेवून त्यांना कोंढवा पोलीस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे मान्य केल्याने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करून गुन्हा उघडकिस आणला आहे.
वरील नमुद कारवाई ही पोलीस उप-आयुक्‍त, परिमंडळ-५ नम्रता पाटील, सहा.पोलीस आयुक्‍त वानवडी विभाग राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शजगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोहवा सतिश चव्हाण, पोना निलेश देसाई,  गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, तुषार आल्हाट, पो.अं. लष्मण होळकर, विशाल ठोंबरे, सागर भोसले व संतोष बनसुडे यांच्या पथकाने केली आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या सर्व पथकाचे पोलीस आयुक्‍त पुणे शहर यांनी उत्तम कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments