पुण्यातील लष्कर हद्दीतील अनधिकृत अतिक्रमण केलेल्यांवर लवकरच गुन्हे दाखल करणार - सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटके...
पुणे :- (प्रतिनिधी मुज्जम्मील शेख) सध्या पुण्यात वाहतुकीची कोंडी पहायला मिळत आहेत व तसेच अनाधिकृत अतिक्रमण केलेल्या पथारी व्यवसायिकांमुळे वाहन पार्क करण्याकरिता जागा नसल्याकारणाने पार्किंग मुख्य रस्त्यावर होत आहे. त्यामुळे मुख्य दुकानदार व व्यापार पेठेतील व्यवसायिकांना या गोष्टीचा नाहक त्रास होत आहे. बऱ्याच मुख्य व्यापार पेठेतील व्यवसायिकांनी याबद्दल तक्रारी दिल्या आहेत.
तसेच अनाधिकृत अतिक्रमण केल्यामुळे गर्दी होत असल्याने लष्कर वाहतूक पोलीस स्टेशनला व त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील या गोष्टीचा त्रास होत आहे.
तसेच अनाधिकृत अतिक्रमण केल्यामुळे सामान्य नागरिकांना देखील या गोष्टीचा त्रास होत आहे. व वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे लवकरच अनाधिकृत अतिक्रमण केलेल्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटके यांनी सांगितलं आहे.
Post a Comment
0 Comments