Type Here to Get Search Results !

6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात ; असं असेल वेळापत्रक...


पुणे : शहरातील मेट्रो वाहतुकीचे वेगवान जाळे निर्माण करणाऱ्या महामेट्रोच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यात मेट्रोच्या फुगेवाडी स्टेशन ते पिंपरी स्टेशन आणि वनाज स्टेशन ते गरवारे महाविद्यालय स्टेशन या दोन टप्प्यांचे उद्घाटन होणार आहे. यासह अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. मोदींचा हा पुणे दौरा भाजप कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरणार आहे.
कुठे कुठे जाणार मोदी ?
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी महामेट्रोच्या उदघाटनासाठी पुण्यात येणार आहेत . 6 मार्च रोजी सकाळी 10:30 मिनीटांनी लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे.
  2. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा पारपडणार आहे.
  3.   पंतप्रधान मेट्रोच्या उद्घाटनासाठी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशनवर जातील. तेथून मेट्रोने ते आनंदनगर स्टेशन येथे जाणार आहेत.
  4. मेट्रोचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची जंगी सभा होणार, आगामी महापालिका निवडणुकीसाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार असून , भाजप कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळणार आहे.
  5. एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावरील सभा आटोपल्यानंतर हेलिकॉप्टरने ते लवळे येथील कार्यक्रमाला जाणार आहेत.
  6. लवळे येथील कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.

Post a Comment

0 Comments