Type Here to Get Search Results !

शरीरा विरुद्ध गुन्हे करणार्‍या सराईत व तडीपार गुन्हेगारास मार्केटयार्ड पोलिसांनी केले जेरबंद...

शरीरा विरुद्ध गुन्हे करणार्‍या सराईत व तडीपार गुन्हेगारास मार्केटयार्ड पोलिसांनी केले जेरबंद...

पुणे :- मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेडकर नगर झोपडपट्टीत शरीरा विरुद्ध गुन्हे करणारा सराईत व तडीपार करण्यात आलेल्या प्रकाश उर्फ पापू दत्ता गांजे वय 26 वर्षे रा.गल्ली नंबर 7 आंबेडकर नगर पुणे या गुन्हेगारास मार्केट यार्ड पोलिसांनी जेरबंद केले याच्याविरुद्ध मार्केट पोलीस स्टेशन पुणे शहर येथे शरीरा विरुद्धचे 03 गुन्हे दाखल आहेत.

आंबेडकर नगर झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या सराईत गुन्हेगार तडीपार आरोपी प्रकाश उर्फ पप्पू दत्ता गांजे मा. पोलीस उपायुक्त सो परिमंडळ 5 पुणे शहर यांनी दोन वर्षासाठी तडीपार केले असून, मागील 01 वर्षापासून तडीपार आहे.

पोलीस शिपाई 10153 स्वप्नील कदम मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम यांना फोन करून कळवले की, त्यांना त्यांचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, पुणे शहरातून तडीपार केलेला मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे रेकॉर्डवरील आरोपी प्रकाश उर्फ पप्पू दत्ता गांजे राहणार गल्ली नंबर 7 आंबेडकर नगर मार्केट यार्ड पुणे हा गल्ली नंबर 14 चे सार्वजनिक शौचालय चे आडबाजूला कमरेला कोयता लावून उभा आहे. त्यावेळी लागलीच पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी सदरची बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे यांना सांगितले असता त्यांनी सदर बातमीची खात्री करून पुढील कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिल्याने पोलीस नाईक 6996 जाधव ,पोलीस नाईक 7554 जाधव, पोलीस शिपाई 8386 लोणकर ,पोलीस शिपाई 9193गायकवाड , पोलीस शिपाई 8353सूर्यवंशी,असे सर्व नेमणूक मार्केट पोलीस ठाणे पुणे असे पंचनाम्याची सर्व साहित्य सोबत घेऊन बातमीचे ठिकाणी रवाना झालो बातमी प्रमाणे आम्ही मार्केट यार्ड आंबेडकर नगर गल्ली नंबर 12 चे आडबाजूला उभे राहून पाहणीत करता. रेकॉर्डवरील  तडीपार आरोपी प्रकाश उर्फ पप्पू दत्ता गांजे हा गल्ली नंबर 14 चे सार्वजनिक संडास जवळ उभा असलेला दिसला त्यावेळी आम्ही सर्व स्टाफ सोबत त्याच्या दिशेने जात असताना तो आम्हाला पाहून पळून जाण्याची स्थितीत असताना आम्ही त्या जागीच सायंकाळी 21/10 वा पकडले असून त्यांच्याकडून ऐक कोयता हस्तगत करण्यात आला व त्यास गु.र नं 174 / 2021 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 भारतीय हत्यार कायदा कलम 4सह 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3) सह 135 या गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे.

 सदरची कारवाई पूर्व प्रादेशिक विभाग चे अप्पर पोलीस आयुक्त श्री नामदेव चव्हाण ,परिमंडळ 05पोलीस उप आयुक्त श्रीमती नम्रता पाटील, वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस अमलदार हिरवळे, महेश जाधव, किरण जाधव, स्वप्निल कदम, अनिस शेख, संदीप घुले, संदीप सूर्यवंशी, अमरनाथ लोणकर व अनिरुद्ध गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments