Type Here to Get Search Results !

लष्कर पोलीस स्टेशनचा रिक्षाचालकांसाठी आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन...

लष्कर पोलीस स्टेशनचा रिक्षाचालकांसाठी आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन...
रिक्षा चालकांना बक्षीस जिंकण्याची संधी...
पुणे :- (दि.24 सप्टेंबर) लष्कर पोलीस स्टेशनच्या वतीने रिक्षा चालकांसाठी कामात प्रोत्साहन देण्यासाठी "माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा २०२१" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे शहरात मागील काही दिवसांत काही रिक्षा चालकांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांकडे वेगळ्या दृष्टीने पाहू नये यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होते आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त व पोलीस सह आयुक्त यांच्या सूचनेनुसार नागरिकांना रिक्षात प्रवास करताना सुरक्षित वाटले पाहिजे. रिक्षा चालकांची प्रतिमा उंचवावी व पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या नियमाचे पालन करण्याची सवय व्हावी. यासाठी लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील रिक्षा चालक व मालक यांच्या साठी नवरात्रोस्तव २०२१ निमित्त "माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा २०२१" या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

किती मिळणार बक्षीस ?
या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रथम पारितोषिक रोख रु ११०००, द्वितीय पारितोषिक रोख रु. ५००० आणि तृतीय पारितोषिक रोख रु. ३००० या बक्षिसांसह ०५  उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी १००० रुपये व उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी ५०० रुपये देण्यात येणार आहेत.

कधी होणार कार्यक्रम ? 
दि. ७/१०/२१ ते १९/१०/२१ या कालावधीत स्पर्धा घेण्यात येणार असून, त्यासाठी २४ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत नाव नोंदणी करण्यासाठी लष्कर पोलीस स्टेशन येथे अर्ज भरून द्यायचे आहे. जास्तीत जास्त रिक्षा चालक व मालकांची प्रतिमा उंचावण्यासाठी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त सागर पाटील व लष्कर विभागचे सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असुन अशी माहिती लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित राऊत, उपनिरीक्षक प्रल्हाद डोगळे, सहाय्यक उपनिरीक्षक शिर्के, पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंग, महिला पोलीस हवालदार रहिसा शेख, महिला पोलीस नाईक रूपा ईनामदार व आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments