मुंबई : बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याला हृदयविकाराने गाठलं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली.
मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे.
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या आधी काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे.
Post a Comment
0 Comments