पुणे :- सध्या कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयंकर झालेली असताना, दि.२१ एप्रिल रोजी कोंढवा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद यांना अंकित विनोद सोलंकी नावाचा इसम हा जायका हॉटेल कोंढवा येथे कोराना १९ रुग्णांना अत्यावश्यक असणारे रेमडिसीवर इंजेक्शन हे विनापरवाना चढया दराने विक्री करत आहे,” अशी बातमी प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) शब्बीर सय्यद यांनी साध्यावेशामध्ये तपास पथक अधिकारी प्रभाकर कापुरे व पोलीस अंमलदार यांचे छापा पथक तयार करुन बनावट गिऱ्हाईक यास अंकित विनोद सोलंकी याच्याकडे रेमडिसीवर इंजेक्शन घेणेकामी पाठविले. सदर रेमडिसीवर इंजेक्शन विक्री करणारा इसम अंकित विनोद सोळंकी वय-२६ वर्ष, धंदा- फार्मासिस्ट, रा. फ्लॅट नं-३०१, सुखवानी कॉम्पलेक्स, ११ नं बस स्टॉप मागे, दापोडी, पुणे हा जायका हॉटेलच्या जवळ येवुन आडबाजुस बनावट ग्राहकास घेवुन जावुन त्यास दोन इंजेक्शन दाखवुन, एका इंजेक्शनसाठी १०,०००/- रु मागणी केली. तसेच एका इंजेक्शनची १०,०००/- रु रोख रक्कम स्विकारुन १०,०००/- रु रक्कम ऑनलाईन स्वरुपात मागणी करत असताना त्यास छापा टाकुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे रेमडिसीवर इंजेक्शनाबाबत तपास केला असता त्याने सदर रेमडिसीवर इंजेक्शन हे डॉक्टरांनी ज्या पेशंन्टला आवश्यकता आहे, त्यांना प्रिरक्रीप्णन लिहुन दिलेले असते, ते प्रिर्क्रीप्शन चोरी करुन त्याचा गैरवापर करुन ससुन हॉस्पीटल येथील संजीवनी मेडिकल स्टोअर्स मधुन खरेदी केले असल्याचे सांगितले. तसेच ते इंजेक्शन चढया भावामध्ये काळयाबाजारे विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली असल्याने त्याच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे येथे गुरन ३३५/२०२१, भादंवि कलम ४२० सह परिच्छेद-२६ औषध किंमत नियंत्रण आदेश-२०१३, सह वाचन कलम ३(२)(सी) जीवनावश्यक वस्तुंचे अधिनियम-१९५५ चे उल्लंघन दंडनिय कलम-७(१)(ए)(२) तसेच औषध व सौंदर्य प्रसाधणे कायदा-१९४० चे कलम १८(सी) चे उल्लंघन दंडनिय कलम- २७(बी)(२), कलम-१८ए व कलम २२(ए)(सीसीए) चे उल्लंघन अनुक्रमे दंडनिय कलम २८ व कलम २७ डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चालु आहे.
रेमडीसीवर इंजेक्शनाचा काळाबाजार करणाऱ्या फार्मासिस्टला कोंढवा पोलिसांनी केले अटक...
April 23, 2021
0
Post a Comment
0 Comments