Type Here to Get Search Results !

उद्या 8 वाजेपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू...

उद्या 8 वाजेपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू...
मुंबई :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यापूर्वीच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे त्यावेळेपासूनच ठाकरे
सरकारने कडक लॉकडाऊनची तयारी सुद्धा केली होती. त्यानुसार आता राज्यात 22 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. त्याबद्दल नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.

गेल्या 2 दिवसांपासून कोरोनाच्या स्थितीबाबतचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होत होती. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा अशी चर्चा या बैठकीत झाली होती. त्यानुसार, उद्धव ठाकरे आज याबद्दल निर्णय जाहीर करणार होते. मात्र, नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत हा शेवटचा पर्याय निवडा, असा सल्ला दिला होता. परंतु, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊनचा पर्याय निवडण्यात आला आहे. 1 मे पर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन असणार आहे.

Post a Comment

0 Comments