Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची तयारी करण्याचे दिले आदेश...

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची तयारी करण्याचे दिले आदेश...
टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) - मंत्रालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण बंदी घालीव तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येने निर्बंध पाळत नसतील तर लाॅकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ :-
राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. बेड व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडताहेत. त्याच्यापार्श्वभूमीवर आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित टास्कफोर्सची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाॅकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत.

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डाॅक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
करोनाचे निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लाॅकडाऊन लावू संसर्ग थोपवावा या विषयावर बैठकीत चर्चा झाली.

Post a Comment

0 Comments