Type Here to Get Search Results !

पुण्यातील फॅशन स्ट्रीट मार्केटला हसनभाई शेख प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसिन शेख यांनी दिली भेट...

पुण्यातील फॅशन स्ट्रीट मार्केटला हसनभाई शेख प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसिन शेख यांनी दिली भेट...

पुण्यातील कॅम्प येथील प्रसिद्ध असलेले फॅशन स्ट्रीट मार्केटला शुक्रवारी लागलेल्या आगीमुळे छोट्या उद्योगांना या घटनेचा मोठा परिणाम झाला व तेथे असलेल्या हॉकर्स आणि स्टॉल मालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी हसनभाई शेख प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसिन भाई शेख यांनी समक्ष भेट घेऊन चर्चा केली व पाहणी केली आहे. व त्यांचे सांत्वन केले.
या मार्केटमध्ये ऍक्सेसरीज आणि कपड्यांचे सुमारे 600 स्टॉल्स व दुकाने पूर्णपणे ज्वलंत झाले आहेत. आणि सर्व मौल्यवान वस्तू या आगी मध्ये गमावले गेले आहेत.
याचा सुमारे 1500 कुटुंबांवर दुर्दैवी परिणाम झाला आहे. हसनभाई शेख प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहसीन भाई शेख यांनी व्यापाऱ्यांना वचन दिले आहे की, ज्या लोकांचे नुकसान झाले आहे, त्या गरजू लोकांना रेशन व अन्य मदत देणार असल्याचे सांगितले आहे. व त्यांच्या सोबत आम्ही उभे आहोत. व हे क्षेत्र कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कक्षेत येत असल्याने शेख यांनी पुणे छावणी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार साहेब यांना विनंती केली आहे की, फॅशनस्ट्रीट मार्केटच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ते सहाय्य करावे. यासाठी मागणी केली आहे. त्यावेळेस वसीम कुरेशी, न्यू युनिक फाऊंडेशनचे अध्यक्ष मुज्जम्मील शेख व आदी व्यापारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments