Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करणाऱ्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई आणि अटक...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करणाऱ्यांवर त्वरित कायदेशीर कारवाई आणि अटक...
पिंपरी चिंचवड - (प्रतिनिधी प्रणव बर्डे) प्रभाग क्र ९ अजमेरा मासूळकर कॉलोनी मधील नेहरुनगर या भागातील मेहबूब मलिक तसेच प्रभाग क्र 21 संत तुकाराम नगर मधील झुबेर शेख या इसमानी स्वतःच्या फेसबुक अकाउंट वरुन शिवाजी महाराजांचा फोटो एडिट करुन पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचा चेहरा एडिट करुन जो मजकूर लिहिला होता "भारत को डुबानेवाला आखरी बादशाह" तसेच बांगलादेश के पास शेख हसीना, तो भारत के पास फ़ेक नगिना, बादशाह ए तबाही' ज्यामुळे समाजात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धार्मीक तेढ निर्माण करण्याचा प्रयन्त केला. ही पोस्ट वायरल होताच त्वरीत भोसरी विधानसभेचे आमदार व भाजपा र्पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेशदादा लांडगे तसेच प्रभागाचे माजी नगरसेवक भाजप नेते राजेश आण्णा पिल्ले यांना कळवून पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेऊन सदर प्रकरण सांगुन निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थीत ज्योती खंडारे, सोनम गोसावी, सिध्दी  सोनावणे, संदीप पाल्हाडे, अमन तिवारी, प्रदिप कलापुरे व आदि कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन देताक्षणी त्वरित कारवाई करण्याचे आदेश आयुक्त साहेबांनी दिले आणि दोन्ही इसमास अटक करण्यात आली. असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्टमुळे समाजामधे धर्मीक भावना दुखावल्या जावु नये व येणारी शिवजयंती शहरात शांततेमध्ये पार पडावी, यासाठी त्वरित कारवाई केल्याबद्दल पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश, तसेच मिलिंद वाघमारे सर यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments