पुणे :- डिजीटल सेवा केंद्राच्या माध्यमातून आमदार चेतनदादा तुपे यांच्या प्रोत्साहनाने आणि मार्गदर्शनाने युवा पिढीला रोजगार मिळावा व नागरिकांना कुठेही धावपळ न करता एकाच ठिकाणी त्यांची कामे व्हावे याकरिता सर्वो सेवा नागरिक ई-सुविधा केंद्राच्या शाखेची पुण्यातील बी.टी. कवडे रोड येथे स्थापना करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वो सेवा केंद्राच्या माध्यमातून सरकारी योजना आणि त्यांपासून मिळणारे फायदे याबद्दल नागरिकांना जागरूक करणे व त्यांचा लाभ घेण्यास मदत केली जाते. (आप की सेवा-देश की सेवा) या धोरणा अंतर्गत युवा पिढीस जागरूक करून निरक्षर लोकांना त्या सुविधा सोप्या रीत्याने पोहचवण्याचे काम सर्वो सेवा केंद्रातून केली जाते असे सर्वो सेवा केंद्राचे मालक सोहेब नाशीर शेख यांनी सांगितले आहे.
शाखेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख उपस्थिती नगरसेविका पुजा समीर कोद्रे, समीर बंडू (तात्या) गायकवाड, अल्ताफ सय्यद, बबलू सय्यद, हसीना इनामदार ,ऍड हक्कानी नासरजंग, जावेदभाई इनामदार, मुजम्मील शेख, रुपेश गायकवाड व आदी मान्यवर उपस्थित होते.
शाखेच्या उद्घाटन समारंभात सर्वो सेवा केंद्र शाखा प्रमुख बि.टी.कवडे रोड अरबाझ नाशीर शेख, मुजाहिद राज, सलमान सय्यद, सलमान शेख, सफियान खान, अनिल तिवारी, फैजस शेख आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments