Type Here to Get Search Results !

Breaking News : जपान मध्ये सापडले ब्रिटनहून अधिक घातक कोरोना विषाणू ; भारतात शिरकाव होण्याची शक्यता...


Breaking News : जपान मध्ये सापडले ब्रिटनहून अधिक घातक कोरोना विषाणू ; भारतात शिरकाव होण्याची शक्यता...

 ब्राझील मधून जपानमध्ये आलेल्या चार प्रवाशांमध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रकार आढळून आला असून त्याची पुष्टी जपानच्या आरोग्य मंत्रालयाने केली आहे. वरील चार प्रवासी ब्राझीलच्या ॲमेझॉन राज्यातील आहेत. सध्या आढळून आलेल्या नवीन विषाणू वरती औषध शोधून काढण्याचे काम जपानच्या आरोग्य मंत्रालयाने हाती घेतलेले असल्याची माहितीही मंत्रालयाने दिली. तसेच या व्हायरसचा भारतात शिरकाव होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

कोरोनाचे जे नवीन विषाणू आढळून आले आहेत ते ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळून आलेल्या करोणा विषाणू पेक्षा वेगळे आहेत. जपानच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शन्स डिसीजेस' या संस्थेचे प्रमुख टाकाजी वाकीता यांनी यासंदर्भात माहिती दिली असून ते पुढे म्हणाले की, 'आत्ताच्या घडीचा विचार केला असता नवीन कोरोना विषाणू हा जुन्या विषाणू घातक आहे की सौम्य आहे, याचे पुरावे आणि माहिती अजून प्राप्त झाली नाही'.

Post a Comment

0 Comments