मुज्जम्मील शेख यांच्या पाठपुरावठ्याला यश...
पुणे :- पुणे कॅन्टोन्मेंट भागात जुने पुलगेट बसस्थानकापासून भैरोबा नाला या दरम्यान पथदिवे जवळपास दीड ते दोन वर्षांपासून बंद होते. यामुळे तिथे अपघाताचा गुन्ह्यांचा प्रमाण वाढला होता. यापूर्वी बऱ्याच लोकांनी, पोलीसांनी सुद्धा या संदर्भात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला, पुणे मनपाला पत्र दिले होते. परंतु त्याचे काहीच झाले नाही. यानंतर काही लोकांनी व पोलिस अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी युवा किसान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुज्जम्मील भैय्या शेख यांना याबाबत सांगितले व त्यांनी लगेच यावर कारवाई ला सुरवात केली. आणि शेख यांनी विनंती अर्ज देण्यासाठी पुणे महानगरपालिके कडे गेले होते परंतु हे पथदिवे पुणे महानगरपालिकेकडे आहे की पुणे कॅन्टोन्मेंट यांच्याकडे आहे याची खात्री नव्हती परंतु गेल्या चार ते पाच महिन्यांपासून शेख यांनी सतत पाठपुरवठा केल्यामुळे त्यांना हे कळाले आहे की हे पुणे कॅन्टोन्मेंटने पुणे महानगरपालिके कडे हा विभाग सुपुर्द केला आहे. आणि मागील आठवड्यात शेख हे पुणे महानगरपालिकेचे विद्युत विभागाचे अभियंता श्रीनिवास कंदूल साहेब यांची भेट घेऊन याबाबत सांगितले असता त्यांनी लगेच याच्या संदर्भात माहिती घेऊन जवळच्या वानवडी महापालिकेला सूचना दिली की लवकरात लवकर हे काम त्वरीत करून घ्या. अशी सूचना देण्यात आली आहे. आणि शेख यांनी निवेदन दिले होते याचे उत्तर महापालिकेने एका पत्रा द्वारे देण्यात आले आहे. व हे काम लवकरात लवकर चालू होईल असे मुज्जम्मील शेख यांनी सांगितले आहे.
Post a Comment
0 Comments