Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया...

धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया...

पुणे : राष्ट्रवादीचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाल्यानंतर स्वत: मुंडे यांच्यासह त्यांचा पक्षही अडचणीत आला आहे. राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले जयंत पाटील ?

राजकारणात आयुष्य उभं करायला आणि राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही,' असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटील यांनी संगमनेरमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. 'धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच हायकोर्टात देखील यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही न्यायालयीन बाब आहे, अंतर्गत कुटुंबातील बाब आहे आणि धनंजय मुंडेनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. असंही जयंत पाटील म्हणाले.


धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी होऊ लागली आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही आरोप झाले. यात खुलासा झाला. आरोपांमध्ये काही अर्थ नसल्याचं निष्पन्न झालं आहे. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षाला पोहोचणे योग्य नाही. त्याबाबत याबाबत‌ चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे. त्यामुळे कोणी आरोप केला की सत्यता न पडतळता निष्कर्ष काढणे योग नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या भूमिकेनंतर सध्यातरी राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. मात्र आगामी काळात याबाबत नेमक्या काय घडामोडी होतात, हे पाहावं लागेल.

Post a Comment

0 Comments