पुणे :- राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या युवक पुणे शहर उपाध्यक्ष पदी सिने अभिनेते गणेश खुडे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवा किसान संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष सोहेल शेख यांनी दि.2 नोव्हेंबर (सोमवार) रोजी दिले. गणेश खुडे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष राहुल द्विवेदी, राष्ट्रीय सरचिटणीस अनिल दूत, युवक राष्ट्रीय अध्यक्ष ऋषी किलाम व पुणे जिल्हा अध्यक्ष महेबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुज्जम्मील शेख यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. त्यावेळी संघटनेचे पद अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच या संघटनेचे पुणे शहरातील पदाधिकारी यांच्या वाढीचे काम हे गणेश खुडे यांना देण्यात आलेले आहे.
राष्ट्रवादी युवा किसान संघटना ही विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यासाठी व शेतकरी वर्गासाठी कार्यरत आहे. आणि गणेश खुडे यांचा सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभाग असतो. गणेश खुडे हे सिने अभिनेते असून, त्यांची संपुर्ण पुण्यात चांगली ओळख व जनसंपर्क आहे.
Post a Comment
0 Comments