पुणे :- दि. 7 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जावेद ईनामदार यांनी पुणे सायबर क्राईम पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक संदीप गवारी साहेब यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या नावाने फेसबुक वर फेक अकाउंट तयार करून लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहे ते अकाउंट लवकरात लवकर बंद करून सदर व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी या संदर्भात निवेदन दिले. निवेदन देताच साहेबांनी त्वरित त्यावर कारवाई सुरू केली व सदर अकाउंट बंद करण्यात आला. व जो व्यक्ती हा अकाउंट वापरत होता त्या व्यक्तीचा तपास करण्यास सुरुवात केली. त्यावेळीस राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष रुपेश भाऊ गायकवाड, न्यू युनिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मुज्जम्मील शेख, राष्ट्रवादी युवा किसान संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष सोहेल शेख व आदी उपस्थित होते.
बनावट फेसबुक खात्यासंदर्भात जावेद ईनामदार यांनी सायबर क्राईम विभागाला दिले पत्र...
October 07, 2020
0
Post a Comment
0 Comments