Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

4500 किमीहुन आणला 613 किलोचा घंटा...

4500 किमीहुन आणला 613 किलोचा घंटा
अयोद्धा : राम मंदिर निर्माण व्हावे यासाठी विविध संकल्प सोडणारे आणि देशभरातून विटा आणणारे कारसेवक संपूर्ण देशाने पाहिले. मात्र, तमिळनाडूतील रामेश्वरम येथील रामभक्तांनी मंदिरासाठी ६१३ किलो वजनाची घंटा दान केली आहे. रामेश्वरम ते अयोद्ध्या असा ४५०० किलोमीटरचा प्रवास करून ही घंटा रामलल्ला चरणी अर्पण केली आहे. 

लीगल राईट काऊन्सिलतर्फे ही घंटा भेट म्हणून देण्यात आली आहे.

१७ डिसेंबर रोजी रामेश्वरम येथून निघालेली राम रथयात्रा २१ दिवसांत १० राज्यांतून प्रवास करत अयोद्धेत पोहोचली आहे. या यात्रेत एकूण १८ जणांचा सहभाग होता. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्रात पूजनानंतर आत्तापर्यंत राम मंदिर विश्वस्त ट्रस्टला हजारो भक्तांनी दान दिले आहे. तमिळनाडूच्या राजलक्ष्मी मांडा यांच्याहस्ते ही घंटा भेट देण्यात आली.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अधिकारी विनोद सोलंकी यांच्यासमवेत खेरीचे भाजप नेते राजेश्वरसिंग यांचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रीय संघाच्या वतीने लखनऊहून प्रवास करण्यात सहभागी झाले होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के महासचिव चंपत राय या कार्यक्रमास विश्वस्त दिनेन्द्रदास महाराज (निर्मोही अखाड़ा), विमलेंद्र मोहन, मिश्रा (राजा अयोध्या), डॉ.अनिल मिश्रा, माजी विश्वस्त अनुज झा (जिल्हाधिकारी अयोध्या) उपस्थित होते. यांच्यासह राष्ट्रीय सरचिटणीस दिनेश जी, खासदार अयोध्या लल्लू सिंह, आमदार वेद प्रकाश गुप्ता, महापौर ऋषिकेश उपाध्याय यांच्यासह भाजपा सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments