रुग्णालयाच्या नावाखाली ठाकरे सरकारचा 12 हजार कोटींचा घोटाळा...
मुंबई :- मुलुंड येथे ५ हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी २२ एकर जमीन खरेदी करण्याच्या व्यवहाराची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे पाहून त्यावर योग्य ती कार्यवाही करू, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्याला सांगितल्याचे सोमय्या यांनी नमूद केले.
सोमैय्या यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले. या निवेदनात सोमय्या यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना मुंबईत ५ हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी तातडीने २२ एकर जागा अधिग्रहित करण्याचे आदेश दिले.
उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महानगरपालिका आयुक्तांनी एका खाजगी बिल्डराची जागा 3000 कोटींमध्ये विकत घेण्याचा प्रस्ताव पास केला.
Post a Comment
0 Comments