Type Here to Get Search Results !

गावी जाण्यासाठी ११ मे पासून मोफत एसटी सेवा सुरू होणार - परिवहन मंत्री अनिल परब




गावी जाण्यासाठी ११ मेपासून मोफत एसटी सेवा सुरू होणार...


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतही कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. आता सरकारकडून गावी जाण्यासाठी एसटीसेवा सुरू करण्यात येणार आहे. ११ मे पासून ही सेवा सुरू केली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे हा प्रवास मोफत असणार आहे. अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.





मुंबई पुणे येथे अडकलेल्या लोकांना गावी जाण्यासाठी सोमवार ११ मेपासून एसटी सेवा सुरू होणार आहे. मुंबई, पुण्यासह विविध शहरात, गावात अडकलेल्या लोकांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. 


गावी जाण्यासाठी एसटी बसेसचं बुकिंग सुरू होणार निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. तसेच गावी जाण्याचा हा संपूर्ण प्रवास हा मोफत असणार आहे. 





बुकिंग करण्यासाठी महत्वाचे मुद्दे :-





▪२२ जणांचे ग्रुप बुकिंग किंवा वैयक्तिक बुकिंगही करता येणार आहे. ग्रुप बुकिंगसाठी २२ जणांची यादी सादर करून प्रवासाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच वैयक्तिक व्यक्ती किंवा कुटुंबाला जाण्यासाठीही परवानगी घ्यावी लागणार आहे. 





▪शहरी भागात ही परवानगी  पोलीसांकडून दिली जाईल तर ग्रामीण भागात ही परवानगी तहसिलदार कार्यालयाकडून दिली जाईल. 





▪२२ जणांच्या ग्रुपला परवानगी मिळाली की सदर परवानगी पत्र विभागीय नियंत्रकाकडे सादर करून बसची मागणी करायची आहे. ही बस तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत जाईल. 





▪वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रवास करणाऱ्यांनी MSRTC च्या पोर्टलवर जाऊन बुकिंग करायचं आहे. बुकिंग करताना परवानगी पत्र अपलोड करायचं आहे. एसटी बस पहिल्या स्टॉपला सुरू होऊन थेट शेवटचा स्टॉपला थांबेल. 





▪लांब पल्ल्याच्या बसेस प्रसाधनगृहासाठी एसटीच्या डेपोतच थांबणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी खाण्या-पिण्याचं साहित्य सोबत घ्यायचं आहे. 





▪बस सुटण्याआधी सॅनिटाईज केली जाईल, तसेच प्रवाशांना सोडल्यानंतर तिथून निघतानाही ती सॅनिटाईज केली जाईल. 





▪प्रवाशांना मास्क बंधनकार, सॅनिटायझर वापरणे बंधनकार आहे. एका सीटवर एकच प्रवाशी बसण्यास परवानगी, झिक्झॅक पद्धतीने प्रवाशी बसणार...


Post a Comment

0 Comments