Type Here to Get Search Results !

आरपीआय (आठवले गट) यांच्यावतीने दौंड मध्ये रक्तदान शिबीर, ६१ दात्यांनी केले रक्तदान...
आरपीआय आठवले गट यांच्यावतीने दौंड मध्ये रक्तदान शिबीर, ६१ दात्यांनी केले रक्तदान...
सध्या संपुर्ण जगात कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. त्यातच रक्त साठ्यात मोठी कमी असल्याचे पुढे आले आहे. राज्यात रक्त साठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. ३ जुन नंतर हळूहळू लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ब्लड बँकांनी ऐच्छिक रक्तदान शिबीर आयोजित करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यातच शनिवारी ३० मे दौंड शहरात आरपीआयचे (आठवले गट) दौंड शहर कार्याध्यक्ष विकी सरोदे यांच्यावतीने पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशावरून हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. सध्या कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा पुरवठा कमी पडत आहे त्यासाठी प्रामुख्याने हा शिबिर घेण्यात आले आहे. या शिबिरात ६१ दात्यांनी रक्तदान केले. हे शिबीर घेत असताना संपूर्ण संचारबंदी चा पालन करण्यात आले व प्रशासनाला सहकार्य करण्याचे काम या शिबिरात करण्यात आले. हे शिबीर पक्षाचे नेते प्रकाश भालेराव, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश थोरात, मा.नगरसेवक राजु बारवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शिबीर पार पडला. यावेळीस तुषार पवार, राजा जोगदंड, सोनु ओव्हाळ, मयुर मदने, पप्पु पाळेकर व आदी उपस्थित होते.Post a Comment

0 Comments