Type Here to Get Search Results !

Add

Add

गरीबांच्या भावनांशी खेळ करू नका, आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा







गरीबांच्या भावनांशी खेळ करू नका, आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका उद्धव ठाकरेंचा इशारा





पुणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता 21 दिवसांचा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. संबोधनाच्या सुरुवातील मुख्यमंत्र्यांनी घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन, सर्व भीम सैनिकांचे आभार मानले. ते म्हणाले की, भीम जयंतीला सर्व भीम सैनिक मुंबईला येतात, पण यावेळेस त्यांनी शिस्तीचे पालन करुन घरात जयंती साजरी केल्याबद्दल त्यांचे मनातून आभार.





मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, त्या काळात बाबासाहेबांनी विषमते विरोधात लढा दिला होता. आज आपल्याला विषाणु विरोधात लढा द्यायचा आहे. आपण इतक्या दिवस एकजुट राहुन ज्याप्रकारे आपली एकी दाखवली आहे, त्याचप्रमाणे पुढेही अशीच एकी दाखवाल अशी आपेक्षा. मी सकाळीच बोलणार होतो, पण पंतप्रधान बोलणार असल्यामुळे मी नंतर बोलण्याचे ठरवले. सध्या राज्यातील परिस्थिती आपल्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मला विश्वास आहे की, तुमच्या मदतीने आपण सर्वजण हा लढा जिंकू. राज्य सरकार खंबीर आहे वाटेल ते करुन हा आजार राज्यातुन हद्दपार केला जाईल. सध्या राज्यात रोज हजारो चाचण्या होत आहे. इतर राज्यात झाल्या नसतील तितक्या चाचण्या रोज राज्यात घेतल्या जात आहेत. आज पंतप्रधानीं 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला. धन्यवाद हा लढा फार गांभीर्याने घ्यायला पाहीजे. संपूर्ण राज्यातील बांधवांनी लढा सुरू केली आहे. या एकजुटीमुळे मला आत्मविश्वास आहे की आपण जिंकणार. ,मी सातत्याने सांगतोय राज्य सरकार खंबीर आहे. शक्य ते आपण करत आहोत.





- कोरोना आजारातून ठीक होताना मी पाहिल आहे


मी कोरोनाला मात दिलेल्या 6 महिन्याच्या बाळाला आणि 83 वर्षांच्या वयोवृद्धांना बरं होताना पाहिलं आहे. तुम्हालाही हे माहिती असेल, याच्या बातम्याही आल्या आहेत. त्यामुळे कोरोनातून बरं होता येतो. डॉ.ओक यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ते कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहेत. कोरोनामुळे भारतातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना याबाबतची घोषणा केली. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पहिल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा 14 एप्रिल हा शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला संबोधित केलं. मोदींनी देशातील कोरोनाची स्थिती पाहता देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली, त्याबद्दल त्यांचे आभार.




- जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरू राहील...


ही लढाई आणखी प्रखरपणे लढण्यासाठी डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. हे काय करणार तर ट्रिटमेंटची गाईडलाईन ठरवणार आहेत. यात अनेक तज्ज्ञ डॉक्टर आहेत. काही खासगी क्षेत्रातले डॉक्टर आहेत. एक चांगलं काम या टीमने सुरु केले आहे. कोरोनाची लागण झालेली व्यक्ती सापडली की त्यांच्या थेट संपर्कातल्या लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवले जात आहे. त्यांच्यापासून प्रादुर्भाव होता कामा नये याची काळजी घेतली जाते आहे. काही वेळा गैरसोय होते मात्र ती लवकरात लवकर दूर करुन आपण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु केला आहे.


'लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाहीये. परराज्यातील कामगारांनी घाबरुन जाऊ नये. आज वांद्र्यात जे काही घडलं ते काही लोकांनी पिल्लू सोडल्यामुळे घडलं असेल. त्यामुळे अनेकांना वाटलं असेल की आजपासून ट्रेन सुरु होतील आणि आपल्याला घरी जाताल येईल. पण मी सगळ्यांना आवाहन करतो आहे की तुम्ही घाबरुन जाऊ नका आणि मुंबई सोडू नका. महाराष्ट्र तुम्हा सगळ्यांच्या पाठिशी उभा आहे. महाराष्ट्रात तुम्ही सुरक्षित आहात. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.


Post a Comment

0 Comments