दहावीचा भूगोलचा पेपर लोकडाऊनमुळे रद्द नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द…
Times of Maharashtra : लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला होता. दरम्यान या भूगोलाच्या पेपरबाबत शिक्षण खात्याने अखेर मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोना मुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला दहावीचा भुगोलचा पेपर अखेर रद्द झाला असुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
२१ मार्चला इतिहास आणि नागरीक शास्त्र विषयाचा पेपर झाला होता मात्र २३ मार्चला नियोजित भुगोलाचा पेपर रद्द झाला होता.
यासोबतच नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेता संबंधित विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहे.
त्यानुसार नववी आणि आकरावीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे दहावी आणि बारावीला प्रवेश मिळेल. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
Post a Comment
0 Comments