नंबर प्लेट फिटींग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लूट? – वाजीद खान यांनी RTO पुणेकडे केली तक्रार...
पुणे :- पुण्यात वाहनांच्या नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी रोजमेर्ता सेफ्टी सिस्टीम लिमिटेड या कंपनीला दिलेल्या टेंडरअंतर्गत विविध ठिकाणी डिलर व डिस्ट्रीब्यूटर नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, या डिलर्सकडून नंबर प्लेट फिटमेंट चार्जेसच्या नावाखाली वाहनधारकांकडून अवैधपणे पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अँटी करप्शन स्क्वॉडचे सर्व भारत अध्यक्ष वाजीद एस. खान यांनी यासंदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केलं आहे की, दिनांक १२ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सहकारनगर येथील "रोजमेर्ता एचएसआरपी फिटमेंट सेंटर" मध्ये त्यांनी स्वतः वाहनाची नवीन नंबर प्लेट बसवली असता, तिथे अतिरिक्त १०० रुपये 'फिटींग चार्जेस' म्हणून आकारण्यात आले.
तसेच, जुन्या नंबर प्लेट्सही सेंटरने परत न करता स्वतःकडेच ठेवल्या असून, त्यांचा गैरवापर झाल्यास जबाबदारी कोणाची हे अस्पष्ट आहे.
वाजीद खान यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की
अशा डिलर/डिस्ट्रीब्यूटरवर तातडीने कारवाई करण्यात यावी,
ग्राहकांकडून बेकायदेशीररित्या घेतले जाणारे फिटमेंट चार्जेस त्वरित थांबवण्यात यावेत,
तसेच यासंदर्भात एक अधिकृत परिपत्रक जारी करून जनतेला माहिती देण्यात यावी.
ग्राहकांच्या फसवणुकीचे हे प्रकार थांबवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.
यावर पुणे आरटीओ कडून देखील कारवाई करण्याचे संकेत दिले गेले आहे. तसेच कोणत्याही एजन्सीने अतिरिक्त शुल्क मागितल्यास त्याची तक्रार आरटीओ कडे करण्यास सांगितले आहे.
Post a Comment
0 Comments