पुणे – भवानी पेठ येथील ऑर्किड्स स्कूलने यावर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागवून गौरवाची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे या यशात मुलींनी आघाडी घेतली असून, शाळेच्या पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये दोन मुलींचा समावेश आहे.
शाळेतील पहिल्या क्रमांकावर आयेशा अब्दुल लतीफ कारीगर ही विद्यार्थीनी 93.80% गुण मिळवून चमकली आहे. दुसऱ्या क्रमांकावर आयेशा असदुल्लाह खान हिने 93.60% गुण मिळवले आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर अनस इरफान शेख याने 92.00% गुणांसह स्थान पटकावले आहे.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन 100% निकालाची उज्वल कामगिरी साधली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. यशस्वी निकालासाठी विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेले परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य याचे फलित आहे.
या यशानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका हिना शेख यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी अत्यंत समर्पणाने अभ्यास करून हे यश मिळवले आहे. यामध्ये शिक्षकांनी वेळोवेळी घेतलेल्या मार्गदर्शन वर्गांनी आणि वैयक्तिक लक्ष देण्याच्या पद्धतीने फार मोठा वाटा उचललेला आहे.”
पालक आणि विद्यार्थी दोघेही या यशामुळे अत्यंत समाधानी असून, पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ऑर्किड्स शाळेचा हा निकाल भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
शाळेचे 100% निकालाबाबत शाहीदा नासिर खान यांची प्रतिक्रिया...
न्यू महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टचे सचिव शाहीदा नासिर खान यांनी निकालानंतर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले, “या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये केवळ त्यांच्या परिश्रमांचा नव्हे, तर संपूर्ण शिक्षकवर्गाच्या समर्पित प्रयत्नांचा वाटा आहे. विशेषतः गणितासारख्या विषयात मी स्वतः वैयक्तिक लक्ष देत विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आले आहे. कोणत्याही वेळेस विद्यार्थ्यांना शंका असल्यास आम्ही त्यांच्या सहाय्यासाठी तत्पर राहिलो.”
“शिक्षण हे फक्त पुस्तकापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला. मुलांनीही खूप मेहनत घेतली आणि वेळेचे उत्तम नियोजन करून अभ्यास केला, त्यामुळेच आज आम्ही हा गौरवशाली 100% निकाल पाहत आहोत,” असेही खान यांनी नमूद केले.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे गणित आणि इतर विषयावरील भीतीचे रूपांतर आत्मविश्वासात झाले, अशी माहिती शाळेतील इतर शिक्षकांनीही दिली. खान यांचे सातत्य आणि विद्यार्थ्यांसाठी असलेली तत्परता ही यशामागील एक महत्त्वाची कारणीभूत ठरली आहे. तसेच संस्थेचे ट्रस्टी अस्मा ताहेरभोय आणि ओलिंडा परेरा यांचेही परिश्रम निकालात महत्त्वपूर्ण ठरले आहे. तसेच या शाळेला विविध स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Post a Comment
0 Comments