मुंबई शहर सध्या भारत-पाकिस्तान तणावामुळे उच्च सतर्कतेवर आहे.
मुंबई: महाराष्ट्र पोलिसांना सोमवारी एका अज्ञात ईमेलवरून पुढील दोन दिवसांत स्फोट होण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांसह इतर अँटी-टेरर एजन्सीजनी सुरू केली असून, ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कोलाबा येथील महाराष्ट्र कंट्रोल रूमला 'ममता बोरसे' नावाच्या आयडीवरून हा ईमेल आला होता.
ईमेलमध्ये लिहिलं होतं, "मी विनंती करते की तुम्ही (पोलिस) आज, उद्या आणि परवा सतर्क राहा कारण 'एक मोठा स्फोट अचानक होणार आहे... त्यामुळे कुठे आणि कधी होईल हे शोधायला वेळ मिळणार नाही... पण तो जवळच आहे. त्यामुळे हे आपल्या राज्यात किंवा देशात कुठेही होऊ शकतं, म्हणून कृपया दुर्लक्ष करू नका."
पोलिसांनी अद्याप या प्रकरणी गुन्हा नोंदवलेला नाही. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिस कंट्रोल रूम आणि ट्रॅफिक पोलिस कंट्रोल रूमला दररोज अशा धमकीचे किंवा इशाऱ्याचे कॉल आणि मेसेज येतात. प्रत्येक कॉलची चौकशी केली जाते आणि जर कुणी खोडसाळपणा केला असेल, तर संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई होते.
माजी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती, आमदार रवी राणा यांनाही सोमवारी अज्ञात मोबाईल क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. याप्रकरणी खार पोलिसांनी नॉन-कॉग्निजेबल गुन्हा नोंदवला आहे.
गेल्या काही महिन्यांत, अभिनेता सलमान खान, टायगर श्रॉफ आणि राजकारणी झीशान सिद्दीकी यांच्यावर हल्ल्याच्या धमक्यांचे अनेक कॉल आणि मेसेज मुंबई पोलिसांना मिळाले आहेत.
Post a Comment
0 Comments