मध्य प्रदेश: मध्य प्रदेशचे आदिवासी विकास मंत्री आणि भाजप नेते विजय शाह यांनी भारतीय लष्करातील अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. शाह यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात कर्नल कुरेशी यांना अप्रत्यक्षपणे "दहशतवाद्यांची बहीण" असे संबोधले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत, शाह यांच्या विधानाला "गटरची भाषा" असे संबोधले आणि त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. न्यायालयाने सांगितले की, अशा प्रकारची विधाने केवळ संबंधित व्यक्तीसाठीच नव्हे, तर देशाच्या एकात्मतेसाठीही धोकादायक आहेत. या प्रकरणात देशद्रोह, समाजात तेढ निर्माण करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणे यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी शाह यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. टीकेनंतर विजय शाह यांनी जाहीर माफी मागितली असून, आपले विधान चुकीच्या संदर्भात घेतल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही अशा पदावर असलेल्या व्यक्तींनी जबाबदारीने बोलावे, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
या प्रकरणामुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील सुनावणी गुरुवारी
Post a Comment
0 Comments